नामिबियाविरुद्ध विजयी मार्गावर परतण्यास अफगाणिस्तान सज्ज

अबुधाबी – पाकिस्तानविरुद्ध अटीतटीचा सामना गमावल्यानंतर अफगाणिस्तान संघ रविवारी आयसीसी टी-२० विश्वचषकात जेव्हा या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या नामिबियाविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा त्यांच्यासमोर विजयी मार्गावर परतण्याचे आव्हान असेल.

अफगाणिस्तानने सिद्ध केले की, ते असा संघ नाहीत, ज्यांना हलक्यात घेतले जाईल. संघात राशिद खानच्या नेतृत्वात विश्वस्तरीय स्पिन गोलंदाजी आक्रमण आहे. राशिदशिवाय मुजीब उर रहमान व कर्णधार मोहम्मद नबीने जगभरातील विविध टी-२० स्पर्धेत खेळत आपल्या कौशल्यात शानदार सुधारणा केली. सर्वोत्तम स्पिन गोलंदाजांना वेगवान गोलंदाजांची साथ मिळते. संघाने आपल्या सुरुवातीच्या सामन्यात स्कॉटलंडवर दमदार विजय मिळवला, तर शानदार लयात असलेल्या पाकिस्तानला अटीतटीचे आव्हान दिले. अफगाणिस्तानचे फलंदाज आक्रमक होत खेळण्यास ओळखले जातात. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंप्रमाणे आक्रमकपणे खेळण्यास ते माहीर आहेत. पाकिस्तानविरुद्ध नियमित अंतरावर विकेट गमावल्यानंतर ही नबी व गुलबदीन नायबने ४५ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी करत संघाला प्रतिस्पर्धी धावसंख्येपर्यंत पोहचवले. त्यांचे फलंदाज जर २० धावा आणखीन करतात तर पाकिस्तानला येथे विजय मिळवणे कठीण झाले असते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार नबी म्हणालेला की, पराभवानंतर ही त्यांच्या संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. या सामन्यात आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी होत्या. आम्ही सकारात्मक गोष्टींसह पुढे गेलो. आणखीन ३ सामने शिल्लक आहेत. आम्ही चांगले खेळू व आमच्या संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. दुसरीकडे, नामिबिया स्पर्धेत आपली ऐतिहासिक कामगिरी कायम राखण्याचा प्रयत्न करेल. अवघे २५ लाख लोकसंख्या असलेल्या व क्रिकेटच्या फक्त पाच खेळपट्ट्या असलेल्या देशाने स्पर्धेत आतापर्यंत आश्चर्यचकीत करणारी कामगिरी केली आहे. क्वालिफायरमध्ये नेदरलँड व आयर्लंडचा पराभव केल्यानंतर संघाने सुपर-१२ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध अविस्मरणीय विजय मिळवला. त्यांच्या गोलंदाजांनी स्कॉटलंडला १०९ धावांत रोखले, तर लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र त्यांना थोड्या अडचणी आल्या. मोठ्या संघांविरुद्ध लय कायम राखण्यासाठी नामिबियाला कामगिरीची पातळी उंचवावी लागेल. त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध मोठी धावसंख्या रचत आपल्या वेगवान गोलंदाजीचा फायदा घ्यावा लागेल. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …