ठळक बातम्या

नाना पटोलेंनी घेतली पुन्हा फडणवीसांची भेट

  • मुंबई – सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते डावपेच आखण्यात दंग आहेत. विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला. राज्यात विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले. यापूर्वीदेखील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी पटोलेयांनी फडणवीस यांची भेट घेतली होती.
    काँग्रेसचे नेते शरद रणपिसेयांच्या निधनानेरिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत नेतेराजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. १५ नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली होती, तर या रिक्त जागेसाठी भाजपनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे.त्यामुळे या जागेसाठी अटितटीची लढत होईल असा आंदाज व्यक्त करण्यात येत होता.
    प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याच नाना पटोले म्हणाले होते. याच पार्श्वभूमिवर आता नाना पटेले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
    दरम्यान, यापूर्वीदेखील नाना पटोले यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीवेळी फडणवीस यांची भेट घेतली होती. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसतर्फेरजनी पटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. याच जागेसाठी निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली होती. आता पुन्हा एकदा विधानपरिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पटोले यांनी फडणवीस यांची भेट घेतली.
    महाराष्ट्रविधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या ६ जागांमध्येभाईजगताप, काँग्रेस, मुंबई, रामदास कदम, शिवसेना, मुंबई, सतेज पाटील , काँग्रेस, कोल्हापूर, गिरिश व्यास, भाजप, नागपूर, अमरीश पटेल , भाजप, धुळे-नंदुरबार, गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना अकोला, बुलढाणा-वाशिम या जागांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला.
  • आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी प्रज्ञा सातव या बिनविरोध विधान परिषदेवर जाव्यात, यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली. त्यासाठीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की, अशी एखादी दु:खद घटना घडली, तर त्या पक्षाचा उमेदवार बिनविरोध दिला जातो. याबाबत फडणवीस आणि पाटील यांच्याशी चर्चा केली. आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितल्याचे थोरात म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …