नागा चैतन्यचा विसर पडण्यास कोण मदत करत आहे सामंथाची?

सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचा घटस्फोट हा खूप चर्चेचा विषय ठरला होता. खरेतर घटस्फोटानंतर ना सामंथाने आणि ना नागा चैतन्यने त्यावर कोणतेही भाष्य केले. खरेतर या दोघांनाही मीडियापासून दूर राहायचे होते. त्यामुळे गप्प बसण्यातच या दोघांनी शहाणपणा मानला. सामंथा आपल्या आयुष्यात मूव्ह आॅन करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.
नुकतीच ती चारधाम यात्रेलाही जाऊन आलीयं. खरेतर सामंथाने घटस्फोटानंतर अनेक प्रकारच्या अफवा तसेच आरोपांना तोंड दिले आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना सामंथाने सांगितले की, ती कशाप्रकारे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सामंथाने सांगितले, हे तेच सर्व आहे ज्याचा मी विचार केला होता की, हे असेच होईल किंवा यापेक्षाही अधिक. काहीतरी आपल्या आतमध्ये खूप काही बदलून जाते. मला वाटतेय की, देवाने मला मूव्ह आॅन करण्याची ताकद दिली आहे. इतकेच नव्हे

तर लॉकडाऊनमध्येही मी मेडिटेशन करायला सुरुवात केली होती.
सामंथा ही केवळ आपल्या आयुष्यातच अ‍ॅक्टिव्ह नाहीयं, तर सोशल मीडियावरही ती सातत्याने अ‍ॅक्टिव्ह दिसून येते. ती आपले अपडेट्स इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत असते. सामंथा अलीकडेच आपली बहीण शिल्पा रेड्डीबरोबर चारधामच्या यात्रेवर गेली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …