नव्या कोविड-१९ वेरिएंटनंतर आयसीसीने उचलले महत्त्वाचे पाऊल

 

– रद्द केली महिला विश्वचषक क्वालिफायर

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने आफ्रिका खंडात कोविड-१९ चे नवे स्वरूप समोर आल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकासाठी हरारेमध्ये सुरू असलेल्या क्वालिफायर शनिवारी रद्द केल्या, ज्यामुळे क्रमवारीच्या आधारे पाकिस्तान, वेस्ट इंडिज व बांगलादेशने क्वालिफाय केले.
दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरिएंटच्या माहितीनंतर जगभरात भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे अनेक आफ्रिकन देशांच्या प्रवासावर निर्बंध लावण्यात आलेत. आयसीसी म्हणाले की, स्पर्धेला थांबवण्याचा निर्णय या चिंतेच्या आधारे घेण्यात आला की, ओमीक्रोनचा प्रभाव वाढल्यास यात भाग घेणारे संघ पुन्हा आपल्या मायदेशी कसे परततील. हा निर्णय नऊ संघांच्या सुरुवाती लीग सत्रातील स्पर्धेदम्यान घेण्यात आला, ज्यामुळे न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक २०२२ साठी अंतिम तीन क्वालिफायरसोबत आयसीसी महिला चॅम्पियनशीपच्या पुढील चक्रासाठी दोन अतिरिक्त संघांचा निर्णय होतो. आयसीसी याबाबत म्हणाले की, क्वालिफायरचा निर्णय आता संघांच्या क्रमवारीच्या आधारे केला जाईल, ज्याचा स्पर्धा खेळण्याच्या अटींमध्ये उल्लेख केलेला आहे. अशाप्रकारे बांगलादेश, पाकिस्तान व वेस्ट इंडिज आता न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी क्वालिफाय करतील. शनिवारी तीन पैकी दोन निर्धारित सामन्यांचा खेळ (झिम्बॉव्बे विरुद्ध पाकिस्तान व अमेरिका विरुद्ध थायलंड) सुरू झाला होता, पण दिवसाचा तिसरा सामना वेस्ट इंडिज व श्रीलंका यांच्यात होऊ शकला नाही, कारण श्रीलंकन संघातील एका सहयोगी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे पाहण्यास मिळाले. आयसीसीचे स्पर्धा प्रमुख ख्रिस टॅटले म्हणाले की, आम्ही उरलेल्या या स्पर्धेला रद्द करत निराश आहोत, पण एवढ्या कमी वेळात अनेक आफ्रिकन देशांच्या प्रवासावरील निर्बंध पाहता गंभीर जोखीम होती. तसेच संघ आपल्या मायदेशी कसे परततील, हा ही प्रश्न त्यात समाविष्ट होता. ४ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी क्वालिफाय करणाऱ्या संघात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड (आयोजक), पाकिस्तान, वेस्ट इंडिज व बांगलादेशचा समावेश आहे. आयसीसीच्या वक्तव्यानुसार, आयसीसी महिला चॅम्पियनशीप (२०२२ ते २०२५ पर्यंत) च्या तिसऱ्या चक्रात संघाची संख्या वाढवून ती आठ वरून दहा करण्यात आली आहे, ज्यात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका व आर्यंलड या संघांचा समावेश असेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …