नव्या कायद्याने कुलगुरूंचा लिलाव होईल

  • विद्यापीठे युवासेनेची अड्डे बनतील – देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई – ठाकरे सरकार हे घाबरट, पळपुटे आहे. या सरकारचे पेपरफुटीशी थेट संबंध आहेत. या सरकारच्या काळात बलात्कार वाढले, गुन्हेगारीचे रेकॉर्ड वाढले. हे सरकार विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षड्यंत्र करत आहे. नव्या विद्यापीठ कायद्याने येणाऱ्या काळात कुलगुरूंचा लिलाव होईल. एकीकडे मोदी भ्रष्टाचार मुक्त कारभार करत आहेत, तर दुसरीकडे भ्रष्टाचार युक्त कारभार सुरू आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या विविध बाबींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा काळा आहे. त्यावर एक व्यक्ती विद्यापीठाचा, एक राज्यपालाचा आणि तीन व्यक्ती सरकारचे असतील. त्यामुळे या कायद्यामुळे राज्यपालही कटपुतळी बनतील, असा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, भाजप सरकारने केलेल्या विद्यापीठ कायद्याचे तामिळनाडूच्या राज्यपालांनी कौतुक केले. मी तमिळनाडूतील विद्यापीठात खूप भ्रष्टाचार पाहिला. कुलगुरू निवडीचे १० कोटी घेतात. त्यांनी हे बोलून दाखवत आम्ही केलेला कायदा जसाच्या तसा तामिळनाडूत लागू केला. मात्र, आता तोच कायदा बदलला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कुलगुरू पदाचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा फडणवीसांनी केला. मग असे कुलगुरू काय शिक्षण देतील. ते बोलीच्या दुप्पट माल कमवायचं बघतील. या शिक्षणाचे पवित्र क्षेत्र अपवित्र करतील, असा दावा त्यांनी केला.

फडणवीस म्हणाले, जेवढ्या नेमणुका सरकारने आपल्या हाती घेतल्या, आता तिथे युवासेनेची मुले बसतील. विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. हे पिढ्या बरबाद करण्याचे षड्यंत्र आहे. आपण आज लढलो नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. वेळी आमची विद्यापीठे विकली जात होती, ती राजकारणाची अड्डे बनत होती, तेव्हा तुम्ही काय करत होतात, असा प्रश्न येणाऱ्या पिढ्या तुम्हाला विचारतील. कोविडबाबतच्या राजकारणावर फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार जेव्हा-जेव्हा काळी कामे करते, तेव्हा-तेव्हा कोविडच्या मागे लपते. कोविड आहे. नाही असे नाही. मात्र, सरकारचे मोर्चे आणि त्यांची स्वागतकामे, समारंभासाठी कोविड नसतो. जेव्हा-जेव्हा काळी कामे केली जातात. त्याविरोधात आवाज उठवला की, यांना कोविड आठवतो, असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने विद्यापीठ कायद्याचे विधेयक अवैध पद्धतीने मंजूर केले. काळ्या रात्री, काळे काम करणारे हे विधेयक पास केले. ही काळी कामे करणारी लोकं आहेत. यांच्याविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …