नवी मुंबईत फळ व्यापाऱ्याची आत्महत्या

  •  एपीएमसी मार्केटमध्येच संपवले आयुष्य

नवी मुंबई – वाशी येथील एपीएमसी फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फळ मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास संपत कराळे या व्यापाऱ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. व्यापाऱ्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशीमधील एपीएमसी फळ मार्केटमध्ये ‘एन’ विंग गाळा नंबर ९१४ मध्ये व्यापाऱ्याने गळफास घेतला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. व्यापाऱ्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी वाशी मनपा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. व्यापाऱ्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मार्केटमध्येच फळ व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. संपत कराळे (६२ वर्ष) हे फळ मार्केटमध्ये हंगामी फळांचा ओपन शेडमध्ये व्यापार करत होते. एन विंग गाळा नंबर ९१४ मध्ये ते राहत होते. काही व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ते हसमुख आणि स्वभावाने चांगले होते. त्यांचे कोणाशीही भांडण नव्हते. अत्यंत शिस्तप्रिय असलेल्या कराळे कर्जबाजारी झाले होते. घरात काही वादविवाद झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे, अशी चर्चा बाजार आवारात रंगली आहे. एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …