ठळक बातम्या

नवी मुंबईतील एका शाळेत १८ विद्यार्थ्यांना कोरोना

नवी मुंबईतील एका शाळेत १८ विद्यार्थ्यांना कोरोना
पुढील ७ दिवस शाळा बंद
नवी मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील निर्बंध हटवण्यात आले आणि सर्व सेवा, सुविधा, मॉल्स, शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आले. मात्र, आता विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. नवी मुंबईतील घणसोली येथील शेतकरी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील २ दिवसात या शाळेतील १८ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही शाळा शनिवारपासून पुढील ७ दिवस बंद ठेवण्याचेआदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
राज्यात शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेत भर पडली आहे. कतारहून आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला. हा मुलगा घरात न थांबता शाळेत गेल्याने इतर विद्यार्थाना कोरोनाची लागण झाली असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलेआहे. शाळेतील विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे समोर आल्यानंतर विद्यालयातील ८०० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली आहे तसेच घरी राहिलेल्या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी मनपा घरी जावून करणार आहे. कोरोनाची लागण झालेल्या १८ विद्यार्थ्यांवर वाशी येथील सिडको एक्झिबिशन कोरोना सेंटर मध्येउपचार सुरू आहेत. सर्व मुलांची प्रकृती ठीक आहे. या शेतकरी विद्यालयात ८ वी ते१२ वी पर्यंतचेविद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन चिंतेत आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांची आज कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

2 comments