नवी दिल्ली – राजधानी नवी दिल्लीतील सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल सरकारने घेतला आहे. नवी दिल्लीतील प्रदूषण वाढल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे. प्रदुषणाच्या मुद्यावरून आणि अशा परिस्थितीमध्येही शाळा सुरू ठेवल्यावरून सवार्ेच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला फटकारले होते. अखेर नवी दिल्लीमधील सर्व शाळा शुक्रवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्लीतील सगळ्या शाळा बंद करण्यात येणार आहेत. प्रदुषणामुळे पुन्हा एकदा नवी दिल्लीतील शाळा बंद राहणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवी दिल्ली आणि एनसीआरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदुषणाचा कहर वाढलेला आहे. वाढत्या प्रदुषणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून नवी दिल्लीतील सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सवार्ेच्च न्यायालयाने प्रदुषणाच्या मुद्यावर नवी दिल्ली सरकारला फटकारले होते. नवी दिल्लीतील सरकारी कर्मचाऱ्यांना प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास परवानगी देण्यात आली होती. मग शाळा का सुरू ठेवण्यात येत आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. अखेर केजरीवाल सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …