नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारला घालवायचे- केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा संकल्प

पुणे – कोरेगाव भीमा येथे शनिवारी २०४ वा शौर्यदिन मोठामाटात पार पडला. या निमित्तानेकोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा येथे भेट देत विजयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी त्यांनी नववर्षाच्या सुरुवातील एक संकल्प व्यक्त केली. राज्यातील तीन पक्षांचे असलेले महाविकास आघाडी सरकारला घालवायचा असल्याचेसंकल्प त्यांनी केला आहे.
पत्रकारांनी यावेळी रामदास आठवले यांना नविन वर्षाचा संकल्प काय आहे असे विचारले असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. नवीन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवायचा आहे. रिपब्लिकन पक्ष अत्यंत मजबूत करायचा आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायचा असा संकल्प असणार आहे.
शौर्यदिन आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. १८१८ साली या ठिकाणी ५०० जणांनी बलिदान दिले होते. या निमित्ताने सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विजयस्तंभाला मानवंदना दिली. कोरेगाव भीमा इथला इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीने निधी मंजुर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समिती त्यासाठी काम करेल. त्याचबरोबर तुळापूर आणि वढू इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भव्य बनवले जाईल, असं अजित पवार म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …