नवाजुद्दीन सिद्दीकी यापुढे नाही करणार वेबसीरिज

बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने केवळ चित्रपटांमधूनच नव्हे, तर सेक्रेड गेम्ससारख्या सुपरहिट वेबसीरिजमधून आपल्यातील कलागुण सिद्ध केले आहेत. भलेही नवाजच्या या वेबसीरिजला प्रचंड लोकप्रियता मिळाली असेल,परंतु असे असतानाही त्याने यापुढे ओटीटीवर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. नवाजच्या म्हणण्यानुसार डिजिटल प्लॅटफॉर्मचे कंटेंट पाहून त्याची घोर निराशा झाली आहे.

नवाजने यासंदर्भात बोलताना म्हटले की, डिजिटल प्लॅटफॉर्म आता फालतू क्वॉलिटीच्या कंटेंटसाठी डंपिंग ग्राऊंडप्रमाणे काम करत आहे. एकतर डिजिटल प्लॅटफॉर्मकरिता चांगले शोज नाहीत किंवा मग जुन्या शोजचे सिक्वल दाखवले जात आहेत. ज्यात दाखवण्यासाठी काहीही राहिलेले नाहीयं.
नवाज पुढे म्हणाला,’जेव्हा मी नेटफ्लिक्ससाठी सेक्रेड गेम्स केला होता तेव्हा मी खूप उत्साहित होतो आणि डिजिटल मीडियमला एक चॅलेंज म्हणून घेत होतो. येथे नव्या टॅलेंटसला संधी मिळत होती, परंतु आता तो फ्रेशनेस गायब झाला आहे. आता हा मोठे प्रोडक्शन हाऊस आणि ओटीटीचे सुपरस्टार म्हटले जाणाऱ्या सो कॉल्ड कलाकारांकरिता धंदा बनला आहे. मोठ्या निर्मात्यांना जास्तीत जास्त कंटेंट बनवण्याकरिता खूप पैसे मिळत आहेत. ज्यामुळे दर्जा संपुष्टात आला आहे. नवाजचे म्हणणे आहे की आता ओटीटी शोज झेलणेही मुश्कील झाले आहे आणि अशामध्ये त्याला या बेकार कंटेंटचा हिस्सा मुळीच बनायचे नाहीयं.

नवाजचे म्हणणे आहे की, बडे स्टार्स म्हणवून घेणाऱ्या कलाकारांनाही ओटीटी प्लॅटफॉर्मची भीती वाटते. नवाज म्हणतो,’या स्टार सिस्टमने मोठ्या पडद्याला गिळून टाकले. आता ओटीटीचे सो कॉल्ड स्टार्स आहेत ज्यांच्यावर बॉलीवूडप्रमाणे पैसा ओतला जात आहे, परंतु लोकांना याचा विसर पडला आहे की कंटेंट आजही किंगच आहे. तो जमाना गेला जेव्हा स्टार्सचा बोलबाला होता. लॉकडाऊन आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स येण्यापूर्वी स्टार्स आपल्या चित्रपटांना तब्बल ३ हजार थिएटर्समध्ये रिलीज करत होते आणि तेव्हा लोकांकडे ते पाहण्याशिवाय अन्य कोणताही चॉईस नव्हता. परंतु आता त्यांच्याकडे अमर्याद चॉईस आहेत.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …