नववर्षाची सरकारकडून व्यावसायिकांना गिफ्ट: एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट

मुंबई- नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारने व्यावसायिकांना मोठे गिफ्ट दिलेआहे. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात झाल्याने छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महत्वाचेम्हणजे, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळं मागील काही महिनेएलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती, मात्र १ जानेवारी रोजी इंडियन ऑइलनं व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०२ रुपयांची कपात करण्यात आली. मुंबईत १९ किलो व्यावसायिक सिलेंडरचा भाव १९४८. ५० इतका आहे. याशिवाय दिल्लीत १९९८.५० रुपये, चेन्नईत २१३१ रुपयेआणि कोलकात्यात २०७५ रुपयेदर असणार आहे. तसेच दरम्यान, सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती वापराच्या सिलेंडरचा भाव स्थिर ठेवण्यात आला आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत, दिल्ली ९००, चेन्नईमध्ये९१६ , तर कोलकात्यात ९२६ रुपये दर आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …