नर्सचा खुलासा : मृत्यूपूर्वी मरणाºयांच्या तोंडून निघतात ‘हे’ शब्द

मृत्यूनंतर काय होते, कोणालाच माहीत नाही. जगातील लोक फक्त अंदाज करतात की, मृत्यूनंतर मानवी आत्म्याचे काय होते?, त्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. यासोबतच मृत्यूच्या मुखातून परत आल्याचा दावा करणारे अनेक लोक हेही सांगतात की, मृत्यूनंतर प्रत्यक्षात काय होते?, त्यांच्या शरीराचे काय झाले आणि त्यांच्या आत्म्याने मृत्यूच्या वेषात काय पाहिले?, पण वास्तव कोणालाच माहीत नाही. हे सर्व दाव्यांवर आधारित आहे, पण आता ज्युली नावाच्या नर्सने सोशल मीडियावर सांगितले आहे की, बहुतेक लोक मृत्यूपूर्वी असेच बोलतात.
ज्युली नावाची ही परिचारिका खरंतर एक हॉस्पिस नर्स आहे, म्हणजेच अत्यंत आजारी लोकांची काळजी घेणारी एक नर्स आहे, ज्यांचा आता कधीही मृत्यू होऊ शकतो. ज्युलीने तिच्या डोळ्यांसमोर अनेकांना मरताना पाहिले आहे. ज्युलीने सोशल मीडियावर सांगितले की, तिने आतापर्यंत ज्या रुग्णांची काळजी घेतली आहे, त्यातील बहुतेक रुग्ण मृत्यूपूर्वी हेच बोलतात. खुद्द ज्युलीसाठी हे आश्चर्यकारक आहे, पण हे खरे आहे. ज्युलीने तिच्या टिकटॉक अकाऊंटवर याचा खुलासा केला आहे. @ँङ्म२स्र्रूील्ल४१२ी्न४’्री, े्रस्रस्री१ या नावाने ती ळ्र‘३ङ्म‘ वर उपस्थित आहे, तिला ३ लाख ८० हजार लोक फॉलो करतात.

ज्युली उघड करते की, तिच्या बहुतेक रुग्णांना मृत्यूपूर्वी सावली दिसते. ते आपले मृत नातेवाईक पाहू लागतात किंवा एखाद्या आत्म्याशी बोलणे सुरू करतात. विशेषत: नातेवाईक. ते त्यांना घरी येत असल्याचे सांगतात. ज्युलीने पुढे सांगितले की, मृत्यूपूर्वी बरेच लोक म्हणतात आय लव्ह यू किंवा आधीच मरण पावलेले त्यांचे पालक त्यांना आठवतात. ते सांगतात की, ते त्यांच्यावर खूप प्रेम करायचे.
दुस‍ºया व्हिडीओद्वारे ज्युलीने सांगितले की, मरण्यापूर्वी मृत नातेवाईकांना पाहणे सामान्य आहे. याशिवाय मृत्यूपूर्वी मानवी शरीरात अनेक बदल होत असतात. यामध्ये श्वासोच्छ्वासाची पद्धत, त्वचेचा रंग, ताप, तब्येत बिघडणे असे प्रकार सर्रास घडतात. ज्युलीच्या मते, मृत्यूपूर्वी लोकांची त्वचा जांभळी होते. यासोबतच तोंडातून तीव्र वास येऊ लागतो. या सर्व गोष्टींनंतर माणूस जास्त काळ जगू शकत नाही, याची ती लक्षणे असतात.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …