नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते

ब्रिटन, अमेरिकेच्या पंतप्रधान-राष्ट्राध्यक्षांनाही टाकले मागे
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक नेते बनले आहेत. जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म द मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार अ­ॅप्रुव्हल रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील १३ राष्ट्रप्रमुखांना मोदींनी लोकप्रियतेत मागे टाकले आहे. मोदींची अ­ॅप्रुव्हल रेटिंग ७० टक्के आहे.
दोन दिवसांपूर्वीच म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी हे सर्वेक्षण अपडेट करण्यात आले. त्यात मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत जगभरातील अनेक राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना मागे टाकले. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे मॅन्युअल लोपेज ओब्राडोर, इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी, जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही मोदींनी लोकप्रियतेत मागे टाकले आहे.
द मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, भारतात मे २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली होती. या काळात मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घसरण झाली होती. कोरोनामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला होता; मात्र मोदी सरकारने या कठीण प्रसंगावर मात करून देशाला सावरले होते.
जगातील महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी लोकप्रियतेत मागे टाकले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनच नव्हे, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनॅरो यांनाही मोदींनी मागे टाकले आहे. या सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाचव्या क्रमांकावरून सहाव्या, तर ब्रिटिश पंतप्रधान आठव्या स्थानावरून १०व्या क्रमांकावर आले आहेत.
मे २०२० मध्ये मोदींची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. त्यावेळी मोदींची अ­ॅप्रुव्हल रेटिंग ८४ टक्के होती. त्यावेळी भारत कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत होता. त्याच वर्षी जूनमधील अ­ॅप्रुव्हल रेटिंगच्या तुलनेत यावेळची मोदींची अ­ॅप्रुव्हल रेटिंग चांगली आहे. जूनमध्ये मोदींची अ­ॅप्रुव्हल रेटिंग ६६ टक्के होती. मोदींच्या डिसअ­ॅप्रुव्हल रेटिंगमध्येही घसरण झाली आहे. ही घसरण २५ टक्के आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …