‘नया साल नई उमंग’ : चंद्रकांत पाटलांची सत्तास्थापनेची आशा कायम

पुणे – राज्यातील सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता असून, महाविकास आघडीमधील प्रत्येक पक्ष बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी इच्छुक आहे, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. त्याचबरोबर त्यांनी ‘नया साल नई उमंग’ असे म्हणत पुन्हा एकदा सरकार पाडण्याचे संकेत दिले आहेत.

पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी अनेक मुद्यांवरून राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनावरून देखील त्यांनी सरकारवर जोरदार शरसंधान साधले आहे. या अधिवेशनात राज्यातला कुठलाच प्रश्न मार्गी लागला नाही. उलट सरकारला या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष अन् काही निर्णय घेणे एवढेच काम होते, काही निर्णय संख्याबळाच्या आधारावर करून घेतले. लोकांचे प्रश्न मार्गी लावणे हा हेतू त्यांचा नव्हता, अशी टीका करत अनेक मुद्यांवर सरकारला घेरले. वीजबिल, कर्जमाफी यात गोंधळ आहे, हे प्रश्नदेखील सरकारने मांडू दिले नाहीत. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ज्यामुळे आंदोलन सुरू आहे, त्या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्नदेखील मार्गी लावला नाही, असे सांगतच पेपरफुटीबाबत निर्णय घ्या, अशी मागणीदेखील राज्य सरकारला केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …