ठळक बातम्या

नक्षलवाद्यांचा पुन्हा नंगानाच

बिहारमधील गयामध्ये एकाच कु टुंबातील चौघांची हत्या
पाटणा – गडचिरोलीत २६ नक्षलवाद्यांना चकमकीत यमसदनी पाठविल्याची घटना ताजी असतानाच बिहारमधील गयामध्ये मात्र शनिवारी रात्री उशिरा नक्षलवाद्यांनी अक्षरश: नंगानाच केला. गयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकमधील मौनवर गावात नक्षलवाद्यांनी २ महिलांसह ४ जणांची हत्या केली. हत्येनंतर चौघांचेही मृतदेह घराबाहेर लटकवून ठेवले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एकाच घरातील दोन पती आणि त्यांच्या पत्नींचा समावेश आहे. नक्षलवाद्यांनी त्यांचे घरही बॉम्बने उडवून दिले.
मृतांमध्ये सतेंद्र सिंह, महेंद्र सिंह, मनोरमा देवी आणि सुनीता सिंह यांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांनी पोस्टर्स लावून खुलासा करताना म्हटले आहे की, देशद्रोही आणि मानवतेचा द्रोह करणाऱ्यांना फाशीशिवाय पर्याय नाही. देशद्रोही, खुनी आणि विश्वासघात करणाऱ्यांना मारण्याशिवाय पर्याय नव्हता. अमरेश, सीता, शिवपूजन आणि उदय या चार साथीदारांच्या हत्येचा हा बदला आहे. अशी कारवाई यापुढेही सुरूच राहील. घटनास्थळी लावलेले पत्रक जनमुक्ती छात्रकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाने लावण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटारसायकलीही पेटवल्या. या प्रकरणावर बोलताना एसएसपी आदित्य कुमार म्हणाले, ‘निवडणुकीत आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे भ्याड कृत्य केले आहे. ज्या ठिकाणी चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले, त्याच ठिकाणी ही हत्या झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली आहे. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास घेत आहेत; पण याबाबत परिसरातील एकही व्यक्ती बोलायला तयार नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …