धोनीचे मानधन केले कमी; सहा खेळाडूंना धोनीपेक्षा जास्त मानधन

नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आठ संघांनी एकूण २७ खेळाडूंना आपल्या संघांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी आठ खेळाडू हे परदेशी आहेत. चेन्नई सुपरकिंग्ज, मुंबई इंडियन्स, केकेआर आणि दिल्ली कॅपिटलर्सने प्रत्येकी चार खेळाडू रिटेन केले आहेत, तर आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने प्रत्येकी तीन खेळाडूंना रिटेन केले आहे. सर्वात कमी रिटेनर हे पंजाब किंग्ज संघात आहेत. पंजाबने केवळ दोनच खेळाडू रिटेन केले आहे.
आगामी म्हणजेच २०२२च्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएलच्या) पर्वासाठी संघांनी कोणते खेळाडू रिटेन करणार आहेत याची यादी जाहीर केली आहे. सीएसकेने रिटेन केलेल्यामध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा समावेश आहे. विशेष म्हणजे कर्णधार धोनीपेक्षा चेन्नईच्या व्यवस्थापनाने जडेजासाठी अधिक पैसे मोजले आहेत. त्यामुळेच आजपर्यंत चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू अशी ओळख असणाऱ्या धोनीची ही ओळखही आता पुसली गेली आहे. रवींद्र जडेजा आता चेन्नईसाठीचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तसेच रिटेन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आतापर्यंत पहिली पसंती असणारा धोनी यंदा मात्र चेन्नईच्या संघाची पहिली पसंती नव्हता.
चेन्नईच्या संघाने आधी रवींद्र जडेजाची निवड रिटेन केला जाणारा फर्स्ट चॉइस म्हणून केली. त्यानंतर त्यांनी धोनीला संघात स्थान दिले. चेन्नईच्या संघाने महेंद्रसिंह धोनीला १२ कोटींच्या किमतीला रिटेन केले आहे, तर जडेजासाठी चेन्नईने १६ कोटी मोजले आहेत. म्हणजेच जडेजाला संघात घेण्यासाठी चेन्नईने धोनीच्या तुलनेत चार कोटी रुपये अधिक मोजले आहेत.
पण यंदाच्या आयपीएलमध्ये जडेजा हा असा एकमेव खेळाडू नाही जो धोनीपेक्षा जास्त पगार घेणार आहे. धोनीपेक्षा अधिक मानधन घेणारे तब्बल सहा खेळाडू या रिटेन पॉलिसींतर्गत वेगवेगळ्या संघांनी कायम ठेवले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला १६ कोटी देऊन रिटेन करण्यात आले आहे. मागील पर्वापेक्षा पंतला यंदा एक कोटी रुपये कमी देण्यात आले आहेत. मागील पर्वासाठी त्याला १७ कोटी मिळाले होते.
मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्माला १६ कोटींची किंमत मोजून रिटेन करण्यात आले आहे. मागील पर्वात रोहित शर्माला १५ कोटी रुपये देण्यात आले होते. यंदा त्याला एक कोटींचा फायदा झाला आहे, तर आरसीबीने विराट कोहलीला १५ कोटींना रिटेन केले आहे. विराट आता संघाच्या कर्णधारपदी नसणार, तरी तो संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे. मागील पर्वामध्ये विराटला १७ कोटी रुपये देण्यात आले होते. म्हणजेच यंदा विराटला दोन कोटींचा फटका बसला आहे.
राजस्थान रॉयल्सने कर्णधार संजू सॅमसनला १४ कोटींना रिटेन केले आहे. मागील पर्वात संजू सॅमसनला ८ कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच संजू सॅमसनला एकूण ६ कोटींचा फायदा झाला आहे. सनरायझर्स हैदराबादने कर्णधार केन विलियमसनला १४ कोटी देऊन रिटेन केले आहे, तर मागील पर्वात केवळ तीन कोटी रुपये मिळालेल्या केन विलियमसनला यंदा तब्बल ११ कोटी रुपयांची वाढ मिळाली आहे.

सर्वाधिक किमतीत रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी
रोहित शर्मा, मुंबई – १६ कोटी रुपये
रिषभ पंत, दिल्ली – १६ कोटी रुपये
रवींद्र जडेजा, चेन्नई – १६ कोटी रुपये
विराट कोहली, आरसीबी – १५ कोटी रुपये
केन विलियमसन, हैदराबाद – १४ कोटी रुपये
संजू सॅमसन, राजस्थान – १४ कोटी रुपये
मयांक अग्रवाल, पंजाब – १२ कोटी रुपये
जसप्रीत बुमराह, मुंबई – १२ कोटी रुपये
आंदे्र रसेल, कोलकाता – १२ कोटी रुपये
एम. एस. धोनी, चेन्नई – १२ कोटी रुपये
ग्लेन मॅक्सवेल, आरसीबी – ११ कोटी रुपये
जोस बटलर, राजस्थान – १० कोटी रुपये

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …