ठळक बातम्या

धारावीत एकजण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह!

मुंबई – धारावीतल्या एकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळ चेन्नईतला हा रहिवासी मुंबईत राहतो. संबंधित रुग्ण टांझानियाहून आल्यानंतर त्याची चाचणी केली. त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. टांझानिया हा देश सध्या तरी धोका असलेल्या देशांच्या यादीत नाही. संबंधित व्यक्तीची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्याला विमानतळावर थांबण्यास सांगण्यात आले होते. नंतर संध्याकाळी तो धारावीला निघाला, मात्र ट्रान्झिट रिपोर्टदरम्यान त्याची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. तो ज्या ठिकाणी राहतो, तो परिसर नॉर्थ जीमध्ये मोडतो. या प्रकाराची माहिती कळवल्यानंतर नॉर्थ जी वॉर्डाच्या वैद्यकीय पथकाने त्याचा माग काढला. ताबडतोब सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये रुग्णाला हलविण्यात आले. त्यासोबत असलेल्या दोघांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे नव्हती, तसेच त्याने लसीकरण ही केलेले नसल्याचे समोर आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …