धरमजींना आपला आदर्श मानतो सलमान खान

बॉलीवूडमध्ये फिटनेसची जेव्हा चर्चा होते, तेव्हा त्यात सुपरस्टार सलमान खानचे नाव हे आवर्जून घेतले गेलेच पाहिजे. सलमानचा फिटनेस पाहून अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी फिटनेसकरिता प्रेरित झाले आहेत, परंतु खूप कमी लोकांना ठाऊक असेल की, सलमानला या फिट बॉडीसाठी कुणी प्रेरित केले ते. नुकताच सलमानने एका टीव्ही शोमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे.

सलमान हा रणवीर सिंगच्या क्विज शोमध्ये आपला आगामी चित्रपट अंतिम : द फायनल ट्रुथच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. त्यावेळी त्याच्यासोबत आयुष शर्मा आणि महिमा मकवानादेखील उपस्थित होते. या शोदरम्यान रणवीरशी बोलताना सलमान खानने म्हटले की, बॉलीवूडमधील नव्या कलाकारांचा फिटनेस लक्षात घेऊन त्याला वयाच्या ५६व्या वर्षीही त्याच्या बॉडीची जास्त काळजी घ्यावी लागत आहे.’ दरम्यान जेव्हा रणवीरने फिटनेसकरिता तुला प्रेरित कुणी केले असा सवाल केला असता, सलमान म्हणाला, ‘मी नेहमी धरमजींना फॉलो करत आलो आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भोळेपणा आहे. ते चांगल्या फिजीकसह खूप सुंदर दिसणारे व्यक्ती आहेत.’ या शोमध्ये सलमानने आपल्या स्ट्रगलची कथाही सांगितली. तो म्हणाला, ‘आपल्या करिअरच्या सुरुवातीला मी तीन शिफ्टमध्ये काम करायचो आणि नेहमी प्रार्थना करायचो की, माझे शूटिंगचे लोकेशन लांब असावे जेणेकरून अर्धा तास मी गाडीत झोपू शकेन.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …