ठळक बातम्या

धनत्रयोदशीलाच सराफा व्यापाऱ्यांची दिवाळी, नागपुरात चक्क दोनशे कोटींची उलाढाल

– मंगळसूत्र, अंगठ्यांना मोठी मागणी

– श्रीगणेश व लक्ष्मीच्या मूर्ती व शिक्क्यांना पसंती
– कोरोनानंतर सराफा बाजार पहिल्यांदा वेगात

नागपूर – कोरोनामुळे मागील दोन वर्ष मंदावलेला सराफा बाजार सध्या अनलॉक प्रक्रियेनंतर वेग धरत आहे. त्याचं जितं जागतं उदाहरण धनत्रयोदशीला नागपुरात पाहण्यास मिळाले. या शुभ मुहूर्तावर सराफा व्यापाऱ्यांची दालने ग्राहकांनी गच्च भरलीच नव्हती, तर रात्री उशिरापर्यंत सुरू ही होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, मंगळवारी सराफा बाजाराने एकाच दिवशी चक्क दोनशे कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला. त्यामुळे एकप्रकारे धनत्रयोदशीलाच सराफा व्यापाऱ्यांची दिवाळी साजरी झाली.
यंदा सराफा बाजार तेजी घेईल, असा अंदाज विश्लेषकांनी मांडला होता. त्यामुळे धनत्रयोदशी, दिवाळी आणि लग्नाच्या हंगामाची जय्यत तयारी त्यांनी पूर्वीच करून ठेवली होती. त्यासाठी आपल्या दालनात सर्व प्रकारच्या दागिन्यांचा साठाही त्यांनी सज्ज करून ठेवला होता. त्याला नागपूरकरांनीही उत्तम प्रतिसाद दिला. सोन्याचे भाव जरी आटोक्यात असले, तरी मंगळवारी लहान दागिन्यांची बाजारात सर्वाधिक मागणी होती. त्याशिवाय मंगळसूत्र, गोफ, अंगठ्या पैंजण, कर्णकुंडल, बांगड्या, चांदीच्या वस्तू तसेच श्रीगणेश व लक्ष्मीच्या मूर्ती आणि सोन्याचे व चांदीचे शिक्के आदींची जोरात खरेदी झाली. सोन्याकडे अनेक जण गुंतवणूक म्हणून पाहतात. अशात दिवाळीसारख्या सणाला सोने खरेदी करत गुंतवणूक करण्याची प्रथा भारतीयांमध्ये पूर्वीपासूनच आहे. अशात मागील दोन वर्षांपासून असंख्य नागरिकांचा खर्च आटोक्यात आला आहे. त्यामुळे बहुतेकांनी आपल्याकडे केलेली बचत अशाप्रकारे सोन्यात गुंतवण्यास सुरुवात केल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. आता लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज असे महत्त्वाचे सण शिल्लक असल्याने हा बाजार आणखीन वेग धरेल, असेही विश्लेषकांचे मत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …