द व्हिल ऑफ टाइमचा हिस्सा बनणार रणवीर सिंग

बॉलीवूड इंडस्ट्रीचा एक दमदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या रणवीर सिंगचा ‘८३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने जरी अपेक्षित कमाई केली नसली, तरी चित्रपटातील रणवीरच्या अभिनयाचे मात्र चाहत्यांबरोबरच समीक्षकांनीही भरभरून कौतुक केले. आता रणवीरने सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर रणवीरने बॉलीवूडनंतर ओटीटी जगतातही एंट्री केली असल्याचे स्पष्ट होतेय. रणवीर सिंग हा ॲमेझॉन प्राइमची एपिक
फॅँ टसी टीव्ही सीरिज द व्हील ऑफ टाइमचा हिस्सा बनणार आहे. या सीरिजमध्ये रणवीर हा एका वेगळ्याच रूपात दिसून येतोयं.

मुळात रणवीर सिंगने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो पहिल्यांदा घरात टीव्ही पाहताना दिसून येतो आणि त्यानंतर त्याचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळत आहे. या दरम्यान तो स्वत:चा उल्लेख रणवीर असा नव्हे, तर लॅन-वीर असा करतो. इतकेच नव्हे तर तो सीरिजमधील आपला लूकही दाखवतो, जो खूपच वेगळा आहे. तो एकदम व्हिल ऑफ टाइमच्या व्यक्तिरेखेप्रमाणे दिसतो. त्यावरून तो आता व्हिल ऑफ टाइमचा हिस्सा बनणार असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे. द व्हील ऑफ टाइमच्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग पूर्ण झाले आहे, परंतु हा सीझन ॲमेझॉनची अपकमिंग फिल्म लॉर्ड ऑफ द रिंगमुळे उशिराने रिलीज होणार आहे. हा ॲमेझॉनचा मोठा शो आहे. मेकर्स सध्या द व्हील ऑफ टाइम सीझन २ चे काही एपिसोडस एडिट करण्याचे काम करत आहेत, ज्यावरून त्याचा सीझन २ लवकरच येणार असल्याचे स्पष्ट होतेयं.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …