द्वारकादास मंत्री बँकेच्या तत्कालीन संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल

बीड – येथील द्वारकादास मंत्री बँकेमध्ये २२९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने फेब्रुवारी २०२१ मध्ये द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या आंतरशाखीय समायोजन व्यवहाराची विशेष तपासणी केली होती. यात बँकेतील नियमांचे उल्लंघन झाल्याने दोषी असलेल्या लोकांवर फौजदारी कारवाई करण्यासाठीचा अहवाल सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने सहकार आयुक्तांनी बँकेवर प्रशासकाची नेमणूक केली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या सुभाष सारडा यांचे पुत्र आदित्य सारडा हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती आहेत. आदित्य सारडा हे बीड जिल्हा बँकेचे मागील ५ वर्ष अध्यक्ष होते. बँकेमध्ये झालेला गैरव्यवहार प्रशासकांच्या लक्षात आल्यानंतर प्रशासक मंडळाचे सदस्य बी. बी. चाळक यांच्या फिर्यादीवरून २२९ कोटी ५ लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सुभाष सारडा यांच्यासह २५ जणांवर आता या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेशी संबंधित वाद थांबायला तयार नाही. काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, द्वारकादास मंत्री बँकेवर राज्य सरकारने प्रशासक नेमला होता. त्याचवेळी संचालक मंडळाच्या काळातील काही व्यवहार चुकीचे असल्याचा ठपका ठेवत प्रशासकांनी गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. काही कर्ज वाटपामध्ये बँकेच्या सहसंचालक मंडळाने नियमांचे पालन न केल्याचा ठपका आहे. मात्र मागच्या काही काळात ही प्रक्रिया थंडावली होती. त्यानंतर सदर प्रकरण उच्च न्यायालयात गेले. यावर उच्च न्यायालयाने थेट बीडच्या पोलीस अधीक्षकांनाच शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. तिथपासून मात्र या प्रकरणात वेगाने चक्र फिरताना दिसून आली. शनिवारी सकाळी याप्रकरणात शिवाजीनगर पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. यात सायंकाळी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाला यापूर्वीच बडतर्फ करण्यात आलेले आहे, तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधेशाम सोहनी यांना प्रशासकांनी निलंबित केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …