बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. ते न केवळ प्रत्येक इव्हेंटमध्ये एकत्र दिसून आलेत, तर रोहमन हा सुशच्या घरीच राहत होता. हो, तुम्ही बरोबर वाचलेत. रोहमन हा सुशच्या घरी राहत होता हे आता भूतकाळातच जमा झाले आहे. कारण रोहमनने आता सुष्मिताचे घर सोडल्याची खबर समोर आली आहे. हे कपल वेगळे झाले असून या दोघांचा बे्रकअप झाल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुश आणि रोहमन यांच्यात काहीच ठीक सुरू नव्हते. आता सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या दोघांनी आपले संबंध संपवले आहेत. रोहमन आता सुशच्या घरी राहत नसून तो आपल्या कुणा मित्राच्या घरी शिफ्ट झाला आहे. सुष्मिता आणि रोहमनच्या विवाहाविषयी अनेकदा चर्चा झाली, परंतु एका मुलाखतीत बोलताना रोहमनने सांगितले होते की सुष्मिता, तिच्या मुली (रेने आणि अलीशा) आणि मी एका कुटुंबाप्रमाणे आहोत. कधी मी त्यांच्या पित्याप्रमाणे राहतो, तर कधी त्यांच्यासोबत मित्राप्रमाणे वागतो. त्यावेळेस आम्ही भांडतोही आणि नॉर्मल फॅमिलीप्रमाणे राहतोही. आम्ही एकमेकांसोबत राहणे एंजॉय करतो. त्यामुळे आम्ही अशा प्रश्नांकडे लक्ष देत नाही की आपण लग्न कधी करणार आहोत? जेव्हा लग्न होईल तेव्हा ते लपवले जाणार नाही. सध्या आम्ही वेब सीरिजचे यश साजरे करत आहोत. पुढे विचार करूत की काय होईल ते!
याचवर्षी फेब्रुवारीमध्ये सुष्मिताने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात एका बेकार नात्यातून बाहेर पडण्याची गोेष्ट लिहिली होती. त्यानंतर चाहत्यांनी रोहमन आणि सुशचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यातच आता गुरुवारी सुशने रोहमन शॉलबरोबरच्या आपल्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ते दोघे आता एकत्र नसल्याचे सुष्मिताने स्पष्ट केले आहे. त्यावरून या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे क्लिअर झाले आहे. सुष्मिताने गुरुवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती रोहमन शॉल बरोबर दिसून येत आहे. सुष्मिताने या फोटोबरोबर लिहिले आहे,’मैत्रीने आमचे नाते सुरू झाले. आम्ही मित्र राहूत. रिलेशनशीप खूप आधीच संपुष्टात आली होती. प्रेम बाकी आहे.’