दोन वर्षांनंतर भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू होणार

नवी दिल्ली – जवळपास दोन वर्षांनंतर भारतातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सामान्य होणार आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, भारतातून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे या वर्षाच्या अखेरीस पुन्हा सुरू होतील. सध्या ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत विमानसेवा सुरू आहे; मात्र ती काही देशांपुरती मर्यादित आहे. अशा परिस्थितीत या वर्षाच्या अखेरीस सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सामान्य होण्याची अपेक्षा आहे.
कोरोना महामारीनंतर मार्च २०२०पासून भारतातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती. ही स्थगिती ३० नोव्हेंबर, २०२१ पर्यंत वाढवण्यात आली होती. बुधवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांनी माहिती दिली की, नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे या वर्षाच्या अखेरीस पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले होते की, सरकार आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पुन्हा सामान्य करू इच्छिते आणि त्यासाठी पुढील प्रक्रिया पार पाडली जात आहे. सध्या भारताने यूएस, यूके, यूएई, केनिया, भूतान आणि फ्रान्ससह सुमारे २८ देशांशी एअर-बबल करार केले आहेत. एअर बबल करारांतर्गत, दोन देशांदरम्यान त्यांच्या एअरलाइन्सच्या वतीने निर्बंधांसह विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवले जात आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …