कानपूर – भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये गुरुवारी पहिला कसोटी सामना सुरू झाला. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पहिल्या सत्रामध्ये एक विकेट घेणाऱ्या पाहुण्या टीमच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सत्रामध्ये टीम इंडियाला तीन हादरे दिले. शुभमन गिल (५२) आणि चेतेश्वर पुजारा (१३) यांना बाद केल्यानंतर क र्णधार अजिंक्य रहाणेला बाद करीत कायले जेमिसनने टीम इंडियाला मोठा धक्का दिला.
पहिल्या दिवसाच्या लंच सेशनपर्यंत गिल आणि पुजारा ही जोडी मैदानात होती. लंचनंतर हे दोघेही झटपट बाद झाले. त्यानंतर अजिंक्य रहाणेने या कसोटीमध्ये पदार्पण करणारा मुंबईकर श्रेयस अय्यर सोबत टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही मुंबईकर जोडी मोठी भागीदारी करणार असे वाटत असतानाच जेमीसनने रहाणेला बाद केले. जेमीसनने टाकलेली ५० वी ओव्हर चांगलीच नाट्यमय ठरली. त्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर रहाणे विकेट किपरकडे कॅच देऊन बाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये रहाणे जेमीसनच्या बॉलिंगवर याच पद्धतीने बाद झाला होता, पण रहाणेने या निर्णायवर अपील करीत तात्काळ डीआरएस घेतला. त्यामध्ये तो नाबाद असल्याचे स्पष्ट झाले. मात्र रहाणेला या डीआरएसचा आनंद फार काळ साजरा करता आला नाही. अगदी पुढच्याच बॉलवर जेमीसनने त्याला त्रिफ ळाचित केले. रहाणेने ३५ धावा काढल्या.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …