ठळक बातम्या

देशाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा वीर दास अडचणीत

प्रख्यात स्टँडअप कॉमेडियन आणि बॉलीवूड अभिनेता वीर दास आता चांगलाच गोत्यात आला आहे. त्याच्याविरोधात मुंबईत तक्रार दाखल झाली आहे. वीर दासविरोधात ही तक्रार त्याचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर करण्यात आली आहे. अलीकडेच त्याने अमेरिकेत आपला कॉमेडी शो केला. या शोमध्ये त्याने भारतातील महिला आणि देशाच्या प्रतिष्ठेविषयी वादग्रस्त वक्तव्य केले.

वीर दासने आपल्या अधिकृत यू ट्यूब अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ अलीकडेच अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमाचा आहे. या कॉमेडी शोमध्ये वीर दास भारत आणि येथील महिलांच्या स्थितीची खिल्ली उडवताना दिसून येतो. या व्हिडीओचे टायटल कम फ्रॉम टू इंडियाज आहे. व्हिडीओत वीर दास म्हणतो, ‘मी एका अशा भारतातून आलो आहे जेथे दिवसा महिलांची पूजा करतात आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक दुष्कर्म केले जाते.’ त्याच्या या वक्तव्यावर अनेक भारतीयांनी रोष व्यक्त केला असून, वीर दासवर प्रचंड टीका केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशुतोष दुबे यांनी वीर दासविरोधात मुंबईत तक्रार नोंदवली आहे. वीर दासविरोधात तक्रार नोंदवल्याची माहिती आशुतोष दुबे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे दिली आहे. आशुतोष दुबे यांच्या तक्रारीनुसार वीर दासने पीएम केअर फंडवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …