देशात २४ तासांत ८ हजारांवर नवे बाधित

नवी दिल्ली – देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसचे ८ हजार ५०३ नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात गुरुवारी ७८९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ५८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ४१ हजार ६७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के आहे. राज्यात सध्या १० ओमिक्रॉन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे एकूण २३ रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ९४ हजार ९४३ आहे. अशातच या महामारीमुळे जीव गमावणाºयांची संख्या वाढून ४ लाख ७४ हजार झाली आहे. आकडेवारीनुसार, गुरुवारी ७६७८ कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख ५ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे १३१ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी ७४ लाख ५७ हजार ९७० डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत लसीचे १३१ कोटी १८ लाख ८७ हजार २५७ डोस देण्यात आले आहेत.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …