देशात २४ तासांत २७,३९० रुग्ण

नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात कोरोना संसर्गाचे २४,७४० नवे रुग्ण आढळले, ८२.७ हजार रुग्ण बरे झाले, तर ३४४ लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. कोरोना संसर्गाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. यापूर्वी ३१ जानेवारी रोजी २२,७७५ प्रकरणे नोंदवली गेली होती. तिसºया लाटेच्या पीकच्या तुलनेत, प्रकरणांमध्ये ९३ % घट झाली आहे. २० जानेवारी रोजी ३.४७ लाख नवीन प्रकरणे पीकवर आढळून आली.

सध्या देशात ४.१५ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ६ जानेवारीनंतरचा हा निचांक आहे. त्यानंतर ३.७१ लाख लोकांवर उपचार सुरू होते. २३ जानेवारी रोजी तिसºया लाटेत सर्वाधिक २२.४९ लाख सक्रिय प्रकरणे होती. त्याचप्रमाणे, १४ फेब्रुवारी रोजी बरे झालेल्या लोकांची संख्या ८२,७८८ होती, जी ११ जानेवारीपासून सर्वात कमी आहे. त्यानंतर ६०,४०५ लोकांनी या आजारावर मात केली होती.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १,९६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला असून, ११,४०८ लोक बरे झाले आहेत. याच्या एक दिवस आधी, रविवारी ३,५०२ नवीन रुग्ण आढळले होते. यादरम्यान १७ जणांचा मृत्यू झाला असून, ९,८१५ लोक बरे झाले आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत येथे एकूण ७८.४४ लाख लोकांना संसर्ग झाला आहे. त्यापैकी ७६.६१ लाख लोक बरे झाले आहेत, तर १ लाख ४३ हजार ४१६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …