नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २४,८१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान ४९२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४२,००० रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ८ राज्यांमध्ये १०० हून कमी कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत ५,१०,९०५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आतापर्यंत ४.२७ कोटी रुग्णांची नोंद झाली आहे.
दुसरीकडे, मिझोरममध्ये गेल्या २४ तासांत १,११९ रुग्ण समोर आले आहेत. अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या १०,५९२ आहे. त्याचबरोबर ७५२ लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. राज्यातील पॉझिटिव्हिटी रेट २२.०१ % वर पोहोचला आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २,७९७ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ४० जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दिवसांच्या तुलनेत राज्यात कोरोनाचा आलेख घसरला आहे. गुरुवारी महाराष्ट्रात २७४८ नवीन रुग्ण आढळले होते, तर ४१ जणांचा मृत्यू झाला होता.