देशात रात्रीच्या वेळेस लॉकडाऊन लागणार?; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत

मुंबई – अधिवेशन सुरू झाल्यापासून आज दुसरा दिवस आहे. आपण प्रत्येक जण ३-४ लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात बसतो. देशाचे पंतप्रधानदेखील कोरोना संकटावर गांभीर्याने विचार करत आहेत. सध्या कोरोनाचे संकट आहे. त्याबद्दल खूप गांभीर्याने विचार करत आहेत. देशपातळीवर रात्रीच्या वेळेस लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. काही ठराविक सोडले, तर सभागृहात अजिबात काही जण मास्क घालत नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले की, काही जणांना मास्क घालून बोलता येत नाही, पण बोलून झाल्यानंतर तरी मास्क लावले पाहिजे. इतकी वाईट परिस्थिती आहे की, कोणालाही याचा अंदाज नाही. परदेशात दीड दिवसाला दुप्पट रुग्णसंख्या वाढतेय इतकी भीषण स्थिती आहे. ज्या त्या वेळेत कोरोनाचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. मास्क न लावणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढा. मास्क घातला नाही तर कितीही कोणी प्रयत्न केला, तर हे नियंत्रणात येणार नाही. ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवा, असे त्यांनी सांगितले.

भारतात ओमिक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट
देशात ओमिक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत. आता कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना ओमिक्रॉन बाधित सापडू लागल्याने देशाची चिंता वाढली आहे. राज्येही वाढू लागली आहेत. १४ राज्यांत एकूण २२० हून अधिक जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली यात आघाडीवर आहेत. यामुळे केंद्र सरकारचे टेन्शन वाढू लागले आहे. असे असले तरी लोक नवीन व्हेरिएंटबाबत गंभीर नाहीत. सध्या सुट्ट्यांचा मौसम सुरू आहे. यामुळे ओमिक्रॉन वाढण्याची शक्यता असल्याने याचे संक्रमण रोखण्यासाठी नवीन गाइडलाइन जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना लोकांनी पाळल्या नाही आणि रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर गेली तर पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …