देशात परत या, दुसरा पर्याय नाही – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – सरकार ‘हाय-प्रोफाइल’ फरारी आर्थिक गुन्हेगारांना मायदेशी आणण्यासाठी सर्व मार्ग वापरत आहे आणि त्यांच्याकडे देशात परत येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. ते ‘पतप्रवाह आणि आर्थिक वाढ’ या विषयावरील चर्चेला संबोधित करीत होते. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही धोरणे आणि कायद्यांवर अवलंबून आहोत आणि फरारी आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्यासाठी राजनयिक माध्यमांचाही वापर केला आहे. संदेश अगदी स्पष्ट आहे, आपल्या देशात परत या. यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कोणत्याही आर्थिक गुन्हेगाराचे नाव घेतले नाही. परंतु त्यांच्या सरकारने भूतकाळात विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांसारख्या फरारी आर्थिक गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. सक्रियता दाखवून थकबाकीदारांकडून ५ लाख कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …