नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णसंख्येत घट कायम आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १२ हजार ४२५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही रुग्णसंख्या २३८ दिवसांपैकी सर्वात कमी आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.१९ टक्के आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६५ जणांचा मृत्यू झाला असून, १५ हजार ९५१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी ३५ लाख ८३ हजार ३१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात सध्या १ लाख ६३ हजार ८१६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. विकली पॉझिटिव्हिटी रेट १.२४ टक्के असून, डेली पॉझिटिव्हिटी रेट १.१० टक्क्यांवर आहे. देशात गेल्या २४ तासांत ६४ लाख ७५ हजार ७३३ जणांचं लसीकरण करण्यात आलं. लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत १०२ कोटी ९४ लाख १ हजार ११९ जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
सोमवारी राज्यात ८८९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, १ हजार ५८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना महामारीची दुसरी लाट आता ओसरली आहे. शिवाय, कोरोनामधून बरे होणाºयांच्या संख्येतही वाढ सुरू आहे. ही बाब निश्चितच राज्यासाठी दिलासादायक आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६४,३७,०२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०३,८५० झाली आहे, तर राज्यात आजपर्यंत १,४०,०२८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.