देशात कोरोनाबळीच्या आकड्यात वाढ

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे भीतीचे वातावरण दिसत आहे. अशातच भारतात दररोजच्या कोरोनाबळीच्या आकड्यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. दिवसभरात देशात ६२१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे आठ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाचे १ लाख ०५ हजार ६९१ सक्रिय रुग्ण आहेत. हा आकडा ५४३ दिवसांनंतरचा सर्वात कमी आहे, तर आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ९८ हजार २७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४१ लाख ७५ हजार १७५ रुग्ण आढळले आहेत, तर ४ लाख ६८ हजार ५५४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. कर्नाटक, केरळ, तामिळनाडूसह इतर राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. संसगार्मुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढत आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या आगमनाने भारतासह जगाची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळणाºया या प्रकारांनी अनेक देशांमध्ये कहर केला आहे. या धोकादायक प्रकारामुळे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाºया प्रवाशांवर बंदी घातली आहे.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …