देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ९,४१९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर या व्हायरसमुळे १५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, देशाचा रिकव्हरी रेट ९८.३६ टक्के आहे, तर गेल्या २४ तासांत ८,२५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात ८९३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर १०४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. यामागील सर्वात महत्त्वाचे कारण लसीकरण असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत लसीचे ८० लाख ८६ हजार ९१० डोस देण्यात आले आहेत. नव्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४० लाख ९७ हजार ३८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्ह रेट ०.७३ टक्के आहे. दरम्यान, पॉझिटिव्हिटी रेट सलग ६६ दिवसांपासून २ टक्क्यांनी खाली आला आहे. देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे, तसेच प्रादुर्भावातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी ८९३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १० जणांचा मृत्यू झाला.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …