ठळक बातम्या

देशातील कोरोना बाधितांची संख्या होतेय कमी

रिकव्हरी रेट ९८.३६
१३२ कोटी जणांचे लसीकरण

नवी दिल्ली – देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली असली, तरी कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट कायम आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ७ हजार ९९२ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान देशात ५५९ दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. देशात सध्या कोरोनाचे ९३ हजार २७७ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत, तर रिकव्हरी रेटमध्ये देखील वाढ झाली असून, हा दर सध्या ९८.३६ टक्क्यांवर आहे. मार्च २०२० नंतर हा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे. त्याचबरोबर देशात लसीकरणाचा १३२ कोटींचा टप्पाही गाठला आहे.
देशात गेल्या २४ तासांत ९,२६५ जणांनी कोरोनावर मात केली असून, यासोबतच कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ३ कोटी ४१ लाख १४ हजार ३३१ वर पोहोचली आहे. देशातील रुग्णसंख्या कमी होत असली, तरी मृतांची संख्या मात्र चिंता वाढवणारी आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, या नवीन मृत्यूनंतर देशातील एकूण मृतांची संख्या ४ लाख ७५ हजार १२८ झाली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत १३१.९९ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …