ठळक बातम्या

‘‘देशाकडे १०० कोटींच्या लसींचे मजबूत सुरक्षा कवच’’ लसीकरणाच्या विक्रमानंतर पंतप्रधानांनी व्यक्तकेला विश्वास

१00,00,00,000

‘२१ आॅक्टोबर २०२१चा ‘हा दिवस’ इतिहासात नोंदवला गेला आहे’’
नवी दिल्ली – भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे. देशात आतापर्यंत दिलेल्या कोरोनाविरोधी लसींच्या डोसची संख्या १०० कोटींच्या पुढे गेली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताने इतिहास रचला आहे, हा भारतीय विज्ञान, उद्योग, भारतीयांच्या सामूहिक भावनेचा विजय आहे, असे म्हटले आहे. लसींच्या डोसची संख्या १०० कोटी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचले होते. जिथे त्यांनी रुग्णालय अधिकाºयांशी संवाद साधला.

त्यानंतर त्यांनी इन्फोसिस फाऊंडेशनच्या विश्राम सदनाच्या उद्घाटन प्रसंगी संवाद साधला. २१ आॅक्टोबर २०२१चा हा दिवस इतिहासात नोंदवला गेला आहे. भारताने काही वेळापूर्वीच १०० कोटींच्या लसीचा टप्पा पार केला आहे. १०० वर्षांत आलेल्या सर्वात मोठ्या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी देशाकडे १०० कोटींच्या लसीकरणाचे मजबूत सुरक्षा कवच आहे. ही कामगिरी भारताची आहे. देशाच्या लसनिर्मिती करणाºया, पुरवठा करणाºया आणि लस देणाºया सर्वांचे मनापासून आभार मानतो. काही वेळापूर्वी मी राम मनोहर लोहिया रुग्णालयातील व्हॅक्सिन सेंटरला भेट देऊन आलो. उत्साह आहे आणि जबाबदारीची भावनादेखील आहे की, आपण एकत्रितपणे कोरोनाला पराभूत केले पाहिजे. मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. १०० कोटी लसींच्या डोसचे हे यश मी प्रत्येक देशवासियांना समर्पित करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी १०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केल्यानंतर यासंदर्भात ट्विटही केले आहे. भारताने इतिहास रचला आहे. आम्ही भारतीय विज्ञान, उद्योग आणि १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत. १०० कोटी लसीकरण पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि प्रत्येकाने ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्यांचे आभार, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे लसीकरण मोहीम पुढे नेल्याबद्दल आरोग्य कर्मचाºयांचे सतत कौतुक करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचेही कौतुक केले. मी मनोहर लालजींना बºयाच काळापासून ओळखतो, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिभा समोर आली आहे. मनोहर लाल अनेकदा चांगले प्रयोग करतात. कधीकधी केंद्र सरकारला असेही वाटते की, आपणही असे प्रयोग केले पाहिजेत. मनोहर लाल खट्टर यांनी दीर्घ विचाराने घातलेला पाया हरियाणाच्या विकासासाठी खूप प्रभावी ठरणार आहे, असे मोदी म्हणाले.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *