ठळक बातम्या

देशभरात भटके कुत्रे, मांजरांची संख्या आठ कोटींवर

नवी दिल्ली : प्रत्येक परिसरात अनेक भटके कुत्रे, मांजर दिसत असतात. मात्र, या बेघर, भटके कुत्रे, मांजरांची देशभरात किती संख्या असेल, याचा अंदाज कदाचित बांधता येणार नाही. देशात पहिल्यांदाच स्टेट ऑफ पेट होमलेसनेस इंडेक्स अहवाल प्रसिद्ध करण्यात आली. या अहवालानुसार, देशभरात बेघर मांजर, श्वानांची संख्या ही आठ कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. पेट होमलेसनेस इंडेक्समध्ये भारताला 10 पैकी फक्त 2.4 गुण मिळाले आहेत.
भारतात पहिल्यांदाच ‘अ‍ॅनिमल वेलफेअर एक्सपर्ट’ आणि ‘मार्स पेटकेअर’ यांनी संयुक्तपणे पहिला पेट होमलेसनेस इंडेक्स प्रसिद्ध केला आहे. ‘मार्स पेटकेअर इंडिया’चे संचालक गणेश रमानी यांनी सांगितले की, आतापर्यंत जगभरात बेघर, भटके श्वान, मांजर यांची संख्या मोजण्यासाठी कोणती पद्धत नव्हती. मात्र, पहिल्यांदा अशाप्रकारची मोजणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
‘ईपीएच’ इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, भारतात 82 टक्के कुत्र्यांना भटके कुत्रे समजले जाते आणि 53 टक्के लोकांनुसार, हे भटके कुत्रे लोकांसाठी धोकादायक आहेत. तर, 65 टक्के लोकांना कुत्रे चावण्याची भीती आहे. 82 टक्के लोकांना भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवले जावे आणि त्यांना शेल्टर हाऊसमध्ये ठेवण्यात यावे, असे वाटते. भटक्या कुत्र्यांबाबत जनजागृती करणे आणि लसीकरण करणे यामुळे प्राणी-मानव संघर्षाला कमी करू शकतो. प्रभावीपणे नसबंदी केल्यास भटक्या प्राण्यांची संख्या कमी केली जाऊ शकते.
भारतात जवळपास आठ कोटी बेघर मांजर आणि कुत्रे हे रस्त्यांवर अथवा शेल्टर्स हाऊसमध्ये वास्तव्य करत आहेत. इतकेच नव्हे तर प्राणी पाळणार्‍या जवळपास 50 टक्के लोकांनी किमान एक पाळीव प्राणी रस्त्यावर सोडले असल्याचे सांगितले. 34 टक्के लोकांनी किमान एका श्वानाला रस्त्यावर सोडले असल्याचे सांगितले. तर, 32 टक्के लोकांनी किमान एक मांजर रस्त्यावर सोडले असल्याचे सांगितले.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …