ठळक बातम्या

देव दर्शनाला जाणाºया गाडीला अपघात; १ ठार ११ गंभीर

भीषण अपघातात क्रुझरचा चक्काचूर
उस्मानाबाद – जालन्याहून तुळजापूर याठिकाणी तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी जाणाºया भाविकांच्या एका क्रुझर गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी शहरात वळण घेत असताना, एका अज्ञात वाहनाने क्रुझरला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या दुर्दैवी घटनेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सर्व जखमींवर उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. जालना जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील अकरा तरुण आणि घनसांगवी येथील एक तरुण असे एकूण १२ जण पंढरपूरला देवदर्शनासाठी क्रुझरने जात होते, पण वाटेत तुळजाभवानी देवीचे मंदिर असल्याने तुळजाभवानीचे दर्शन घेऊन पंढरपूरकडे जाण्याचा प्लॅन त्यांचा होता.
यानुसार तुळजापूरच्या दिशेने जात असताना तुळजापूर-सोलापूर महामार्गावर बार्शी रोड पुलावर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पाठीमागून आलेल्या भरधाव गाडीने भाविकांच्या क्रुझर गाडीला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या दुर्घटनेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती तुळजापूर पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी भाविकांवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …