ठळक बातम्या

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला ५ जण ठार, तर ४ जण गंभीररित्या जखमी

खामगाव (बुलडाणा) – देवदर्शनासाठी निघालेल्या अकोला येथील भाविकांच्या वाहनाला अपघात होवून ५ जण ठार झाले तर ४ जण गंभीररित्या जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी चिखली रोडवरील मोहाडीनजिक घडली सर्वजखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . अकोला येथील ९ जण सकाळी टाटासुमो क्र . एमएच ३० एए २२५५ ने पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान मोहाडीनजिक वळणावर समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या दोन मालवाहू वाहनांनी त्यांच्या सुमोला जोरदार धडक दिली . हा अपघात इतका भीषण होता की , या अपघातात टाटा सुमोचा चुराडा झाला आहे. सुमोमधील विश्वनाथ कराड ( ७३), शकुंतला विश्वनाथ कराड ( ६५ ) बाळकृष्ण हरीभाऊ खर्चे ( ७० ) व शामसुंदर रोकडे ( ६५ ) हे चौघे जागीच ठार झाले तर सौ सुनंदा मुरलीधर रोहणकार ( ६० ) यांचा दवाखान्यात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला . अपघातातील गंभीर जखमी सौ . अलका खर्चे , शामराव ठाकरे , उषा ठाकरे व मुरलीधर रोहणकार यांच्यावर अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत . या अपघातामुळे काहीवेळपर्यंत चिखली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती .

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …