दृष्टी नसून ती काढते सुंदर फोटो

सोशल मीडियावर इजिप्तमधील एका छायाचित्रकाराची जोरदार चर्चा आहे. २२ वर्षीय इसरा इस्माईल डोळे नसतानाही लोकांचे असे फोटो काढते, जे पाहून कोणीही म्हणू शकत नाही की, ते काढणारी व्यक्ती दृष्टीहीन आहे. दृष्टीहीन इसरा इस्माईल जन्मापासून पाहू शकत नव्हती. या उणीवानंतरही इसरा इस्माईलने छायाचित्रकार होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले आहे.
असे म्हणतात की, मनात एखादी गोष्ट करायची इच्छा असेल, तर ती कोणीही रोखू शकत नाही. इच्छा आणि उत्कटतेसमोर प्रत्येक कमतरता लहान होऊ लागते. इजिप्तमधील कैरो येथे राहणाºया इसरा इस्माईलला फोटोग्राफीची आवड होती, मात्र इसरा इस्माईल पाहू शकत नाही. एवढी कमतरता असतानाही तिने आपले स्वप्न पूर्ण केले. आज इसरा इस्माईल फोटोग्राफीच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे. तिच्या फोटोग्राफीची चर्चा होत आहे.

२२ वर्षीय इसरा इस्माईल ही अंध छायाचित्रकार आहे. अलेक्झांड्रिया विद्यापीठाच्या कला विद्याशाखेतील अरबी भाषा विभागातून तिने शालेय शिक्षण घेतले. याच काळात ती फोटोग्राफीच्या प्रेमात पडली. सुरुवातीला असे वाटले की, ते अशक्य आहे, मात्र मेहनत आणि खडतर प्रयत्नाने तिने तिचे स्वप्न पूर्ण केले. आज इसरा इस्माईलला महिलांमधील पहिली दृष्टीहीन छायाचित्रकार होण्याचा मान मिळाला आहे. इजिप्तमध्ये अनेक संकटे येऊनही तिने आपले स्वप्न पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
चांगला फोटो काढण्यासाठी पाहणे आवश्यक नसते हे इसरा इस्माईलने तिच्या फोटोंसह सिद्ध केले. ती तिच्या कल्पनेतून छान फोटो काढते. इसराने यासाठी खूप प्रशिक्षण घेतले आहे. त्यासाठी ती प्रथम अंध छायाचित्रण विभागात रुजू झाली. तेथे तिने चांगले फोटो काढण्यासाठी आवश्यक तंत्रे शिकून घेतली. यानंतर तिने अनेक युक्त्या शिकल्या, ज्याद्वारे डोळ्यांशिवाय छायाचित्र काढता येते.

इसरा इस्माईल दिसत नसूनही ती इतकी चांगली फोटोग्राफी कशी काय करते? वास्तविक, इसरा लोकांशी बोलत असताना फोटो क्लिक करते. आवाज ऐकून ती कॅमेºयाचा अँगल सेट करते. यानंतर व्यक्तीपासून दोन मीटर दूर गेल्यावर, फोटो काढण्यास सुरुवात करते. इसरा फोटो काढताना कॅमेरा आॅटो मोडवर ठेवते. सुरुवातीला इसराचे फोटो धूसर असायचे, पण कालांतराने तिने आपल्या कलेवर प्रभुत्व मिळवले. आजच्या काळात इसराने अनेक फोटोग्राफी सेमीनार आणि प्रदर्शनांमध्ये तिच्या कलेचा नमुना सादर केला आहे. तिची कला अनेक केंद्रांवर दाखवण्यात आली आहे. दृष्टीहीन व्यक्ती इतकी सुंदर फोटोग्राफी करू शकते यावर लोकांचा विश्वास बसत नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …