ठळक बातम्या

दुसऱ्या कसोटीपूर्वी कांगारुंना मोठा धक्का: जोश हेजलवुड संघातून बाहेर

मेलबर्न- ॲशेस मालिकेच्या ब्रिस्बेनमध्येझालेल्या पहिल्या कसोटीमध्ये इंग्लंडचा दणदणीत करत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी साठी सज्ज झाला असतानाच ऑस्टेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेजलवुड जायबंदी झाल्यानेतो संघातून बाहेर पडला आहे. या मालिकेमधील दुसरा कसोटी १६ डिसेंबरपासून ॲडलेड येथे सुरू होणार आहे. तत्पूर्वी, यजमान संघाची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातच हेजलवूडला स्नायूंचा ताण पडला होता. हेजलवुड कॅज्युअल ड्रेसमध्ये ब्रिस्बेनहून सिडनीला रवाना झाला. त्याच्यासोबत कोणीही सहकारी दिसला नाही. म्हणजेच ॲडलेडमध्येहोणाऱ्या पिंक बॉल कसोटीमध्ये तो संघाचा भाग असणार नाही. पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी केवळ ८ षटके टाकून तो पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर हेझलवूडच्या तंदुरुस्तीबद्दल अटकळ होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनेही ब्रिस्बेन कसोटी संपल्यानंतर जोश हेझलवूडची दुखापत स्वीकारताना दिसला.
जोश हेजलवूडच्या जागी दुसऱ्या कसोटीसाठी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या रिचर्डसनने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत खेळलेल्या २ कसोटी सामन्यांमध्ये६ विकेट घेतल्या आहेत. यामध्येएका डावात २६ धावांत ३ बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. रिचर्डसन खेळला तर हा त्याचा तिसरा कसोटी सामना असेल. त्याने २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, मात्र २०१९ पासून त्याने आंतरराष्ट्रीय विकेटवर एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या ॲशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात जोश हेझलवूडनेशानदार गोलंदाजी करताना पहिल्या डावात दोन बळी घेतले. त्याने हे दोन्ही गडी ४२ धावांत बाद केले. यानंतर दुसऱ्या डावात त्याने एक विकेट घेतली. अशा प्रकारे त्याने पहिल्या कसोटीत एकूण तीन विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, जर आपण त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोललो तर, हेझलवुडने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत ५६ कसोटी सामने खेळले आहेत ज्यात तो २१५ विकेट्स घेण्यात यशस्वी झाला आहे. त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी ६७ धावांत ६ बाद आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …