अजित पवारांचे मोठे वक्तव्य
मुंबई – कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाºयांवर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याची वेळ आली, तरी अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे वेळ येऊनही दुसरा डोस न घेणाºयांवर काही बंधने आणण्याचा विचार सुरू असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत म्हटले. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या राज्यात बºयापैकी झाली आहे, पण दुसºया डोसमध्ये बरेच जिल्हे मागे आहेत. राज्यात पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आणि दुसरा डोस घेतला नाही अशा लोकांची संख्या जवळपास दीड ते पावणेदोन कोटी आहे. लस उपलब्ध असतानाही हे लोक दुसरा डोस घेत नाहीत. त्यामुळे वेळ येऊनही दुसरा डोस न घेणाºयांवर काही बंधने आणण्याचा विचार करतोय, जेणे करून ते दुसरा डोस घेतील, असेही अजित पवार यांनी म्हटले.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओमिक्रॉनपासून ओबीसी आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांनी म्हटले की, ओमिक्रॉनबाबत मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली आहे. संसर्गाबाबत वेगवेगळ्या प्रकारची मते ऐकायला मिळत आहेत. डोंबिवलीतील रुग्ण होता तो बरा झाला आहे. या रुग्णामुळे इतर बाधित झाले नाहीत. ओमिक्रॉनबाबत समज, गैरसमज असून, केंद्र सरकारने ते दूर करावे असेही त्यांनी म्हटले. देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात लस शिल्लक आहे. राज्यात पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आणि दुसरा डोस घेतला नाही अशा लोकांची संख्या जवळपास दीड ते पावणेदोन कोटी आहे. लस उपलब्ध असतानाही हे लोक दुसरा डोस घेत नाहीत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …