ठळक बातम्या

दुकानदार विकत होता फक्त ५० पैशांत टी-शर्ट

जाहिरात ही एक अशी कला आहे, ज्यामुळे एखादी व्यक्ती त्याच्या व्यवसायात बरीच प्रगती करते. मार्केटिंग तंत्र योग्य असेल, तर छोटा व्यवसायही क्षणार्धात यशाची शिखरे गाठतो. एखादे उत्पादन अधिकाधिक विकण्यासाठी ठेवलेली विक्री देखील या विपणनाचा एक भाग आहे. विक्रीमध्ये एखाद्या उत्पादनाची किंमत कमी करून त्याची विक्री वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. पण या रणनीतीने तुम्हाला पोलिसांच्या जाळ्यात अडकवले तर? असेच एक प्रकरण तामिळनाडूतून समोर आले आहे. येथे एका कपड्याच्या दुकानाच्या मालकाला विक्रीमुळे झालेल्या गर्दीमुळे दुकान बंद करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या तिरुची येथील एका दुकानदाराने आपल्या दुकानाच्या उघडण्याच्या वेळी अशी आॅफर दिली की, तेथे गर्दी उसळली. यानंतर एवढा गोंधळ झाला की, पोलिसांना येऊन दुकान बंद करावे लागले. २१ नोव्हेंबर रोजी हे दुकान सुरू होते. आॅफर अंतर्गत, टी-शर्ट ५० पैशांना विकला जात होता. अशा स्थितीत दुकान उघडताच तेथे प्रचंड गर्दी जमली. वास्तविक, दुकान उघडण्यापूर्वीच आॅफर जाहिरातीद्वारे सर्वत्र सांगितली गेली. अशा स्थितीत दुकानाचे शटर उघडण्याआधीच तेथे लोकांची गर्दी उसळली.

याबाबत असे सांगितले जात आहे की, सकाळी ९ वाजता दुकान उघडताच तेथे प्रचंड गर्दी जमली. ५० पैशांना टी-शर्ट मिळावा, म्हणून लोकांनी नंबर लागण्याकरिता एकमेकांना मारहाणही सुरू केली. एवढी गर्दी होती की, दुकानाबाहेर रस्त्यापर्यंत लोकांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. गर्दी पाहता पोलिसांनी दुकान बंद केले. बºयाच चर्चेनंतर दुपारी १ वाजता दुकान पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात आली.
हकीम मोहम्मद, असे दुकानदाराचे नाव आहे. हकीमने त्याच्या दुकानाच्या जाहिरातीसाठी एक आॅफर दिली. या अंतर्गत सुमारे १ हजार टी-शर्ट विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. अन् त्या एका टी-शर्टची किंमत केवळ ५० पैसे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला; पण फक्त शंभर टी-शर्ट विकता येतील इतकी गर्दी होती. लोकांनी तिथे ५० पैशांचे नाणे आणले होते; मात्र काही तासांनी दुकान बंद होईपर्यंत आॅफर संपली होती. लोकही मास्कशिवाय गर्दीत आले. एवढ्या गर्दीर्मुळे कोरोनाच्या भीतीने दुकान बंद करण्यात आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …