बॉलीवूडमधील सर्वात चर्चित कपलपैकी एक असलेले दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे नेहमी सोशल मीडियावर आपल्या अॅक्टीव्हीटीमुळे चर्चेत असतात. सोमवारी या दोघांना विमानतळाबाहेर स्पॉट करण्यात आले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, कारण या व्हिडीओमुळे दीपिकाला ट्रोल करण्याची संधी युझर्सना मिळाली आहे.
रणवीर आणि दीपिकाचा हा व्हिडीओ फोटोग्राफरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत रणवीर सिंग हा काऊ बॉय अंदाजात दिसून येत आहे, तर दीपिका व्हाईट टी शर्ट आणि ट्राऊझर परिधान केलेली पाहायला मिळत आहे. दोघेही व्हिडीओमध्ये फोटोग्राफरला हसत हसत पोझ देत आहेत. या व्हिडीओत असेही पाहायला मिळते की रणवीर सिंग हा गाडीतून उतरल्यानंतर गाडीचा दरवाजा उघडतो आणि त्यानंतर त्याची पत्नी दीपिका ही बाहेर येते.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट करत दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युझरने लिहिले आहे,‘ती काय नेहमी रणवीर दरवाजा उघडेल याची प्रतिक्षा करत असते… इतके पण काय नखरे?’, तर दुसºया युझरने लिहिले आहे,’ रणवीर पती आहे की ड्राईव्हर? का तिला नेहमी कारचा दरवाजा उघडण्यासाठी रणवीरची प्रतिक्षा करावी लागते?, तर काही चाहत्यांनी रणवीरला उद्देशून सकाळी सकाळी काऊ बॉय बनून कुठे चालला आहे, अशीही विचारणा केली आहे.