दीपक दळवी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

बेळगाव – मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर ॲसिड शाई फेकण्यात आली, तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेनंतर टिळकवाडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दीपक दळवी यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. अशोक दड्डी व संतोषकुमार देसाई यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी १३ डिसेंबर रोजी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा सुरू होता. यावेळी हा शाई फेकण्याचा प्रकार घडला.

गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने आजपर्यंत लढत आले आहेत, मात्र वारंवार कन्नड सरकारकडून त्यांच्यावर अन्याय होत आला आहे. दरवर्षी येथील बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होत असते. याच अधिवेशनावेळी मराठी भाषिकही २००६ सालापासून समांतर असा मेळावा घेत असतात. याच मेळाव्यादरम्यान, एका कन्नड रक्षक वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. या संतापजनक घटनेचा सर्वच स्थरातून निषेध व्यक्त केला जात असून, मंगळवारी बेळगावसह सीमाभागात बंदची सुद्धा हाक देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर मंगळवारी बेळगावसह सीमाभागात बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर बेळगावसह सीमाभागात गल्लोगल्ली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला. प्रत्येक ठिकाणी फलकांद्वारे बंदची हाक देण्यात आली असून, कर्नाटकी गुंडगिरीचाही निषेध व्यक्त करण्यात आला. घडलेल्या या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. अशा प्रकारच्या घटनेमुळे आमची चळवळ थांबणार नाही. याउलट मोठ्या जोमाने ही चळवळ पुढे जाईल असेही यावेळी एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांनी म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …