दीपक चहरची खुन्नस अन् व्यंकटेश प्रसादची आठवण

मुंबई – बुधवारी झालेला भारत-न्यूझीलंडच्या सामन्यातील दीपक चहर आणि मार्टिन गुप्टिल यांच्यामध्ये एक क्रिकेट ‘फाईट मोमेंट’ पाहायला मिळाला. मार्टिन गुप्टिलने एक षटकार मारल्यानंतर त्याने दीपक चहरला खुन्नस दिली. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर चहरने त्याला बाद केले. हा सीन पहिल्यानंतर १९९६ सालच्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची आठवण येते. पाकिस्तानच्या अमिर सोहेलने दिलेल्या खुन्नसला व्यंकटेश प्रसादने त्यावेळी त्याला क्लीन बोल्ड करून उत्तर दिले होते.
हा किस्सा आहे बुधवारच्या सामन्यातील १८ व्या षटकातील. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिलने दीपक चहरच्या पहिल्याच चेंडूवर एक षटकार मारला. त्यानंतर त्याने दीपक चहरला खुन्नस दिली. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर दीपक चहरने मार्टिन गुप्टिलला बाद केले आणि त्याला उत्तर दिले. भारत-आणि पाकिस्तान या दोन संघादरम्यानचा सामना हा केवळ एक सामना राहत नाही तर तो एक संघर्ष, युद्ध असते. १९९६ सालच्या विश्वचषकातील बंगळुरू या ठिकाणी झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होते. पाकिस्तानचा अमिर सोहेल फलंदाजी करीत होता आणि भारताचा व्यंकटेश प्रसाद गोलंदाजी करीत होता. प्रसादच्या एका चेंडूवर अमिरने पुढे येऊन ऑफ साईडला खणखणीत चौकार हाणला. त्यावेळी अमिरने प्रसादजवळ येऊन खुन्नस दिली आणि म्हणाला, पुढच्या चेंडूला त्या तिकडे, सीमेपलीकडे मारणार. अमिरच्या खुन्नसवर प्रसादला राग तर आलेला पण त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. प्रसादने पुढचा चेंडू टाकला आणि अमिर सोहेल क्लीन बोल्ड झाला. त्यावेळी प्रसादने अमिरला तशीच खुन्नस दिली आणि अमिरला म्हणाला, ‘उस तरफ है ड्रेसिंग रूम, चलो निकलो’.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …