दिशा पाटनीने शेअर केली वर्कआऊट सेशनची झलक

कायम सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करण्यात बिझी असलेल्या दिशा पाटनीने नुकतीच आपल्या वर्कआऊट सेशनची झलक शेअर केली आहे.
हा व्हिडीओ दिशाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात ती एका किक बॅगवर फ्लाइंग किक लगावताना दिसून येतेयं. किक बॅगवर किक मारल्यानंतर दिशाच्या चाहत्यांच्या एक्स्प्रेशन्स पाहण्यासारख्या आहेत. व्हिडीओमध्ये दिशा पाटनीने काळ्या रंगाचा ट्रॅक सूट आणि लाल रंगाची शॉर्ट्स घातलेली दिसून येतेयं. दिशाच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रियाही देत आहेत. दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती करण जौहरच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तयार होत असलेल्या ‘योद्धा’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्राबरोबर दिसून येणार आहे. तिने याबाबतची घोषणा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली होती. याशिवाय ती लवकरच मोहीत सुरीचा चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये अभिनेता जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरबरोबर दिसून येणार आहे. तिच्या व्यतिरिक्त या चित्रपटात तारा सुतारियाही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २०१४ मध्ये आलेला सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांचा चित्रपट ‘एक व्हिलन’चा सिक्वल आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …