दिव्यांग खेळाडूंसाठी एचएपी चषक

नवी दिल्ली – देशातील दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी समितीची स्थापना करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)चे सचिव जय शहा यांनी मंगळवारी येथे एचएपी चषकाच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. एचएपी चषक ही दिव्यांगांसाठीची भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. बीसीसीआयने अलीकडेच कोलकाता येथे झालेल्या आम सभेच्या बैठकीमध्ये समितीचे गठन केले होते. एचएपी चषक पंचकुला (हरियाणा) येथे २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. सकारात्मकता आणि प्रसन्नतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी दरवर्षी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावेळीही चार संघांमधील प्रमुख खेळाडूंचे वाटप करण्यात आले असून, राऊंड रॉबिन आधारावर खेळल्यानंतर प्रमुख दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळविला जाणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …