दिवाळीनंतर १०० टक्के उपस्थितीला परवानगी – अजित पवार

ना्यटगृह, चित्रपटगृहांबाबत निर्णय
पुणे – कोरोना स्थिती आटोक्यात आल्यास चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्यास दिवाळीनंतर १०० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. बालगंधर्वमध्ये त्यांच्या हस्ते रंगमंच पूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजविण्यात आली. त्यानंतर नटराजाचे तसेच रंगमंचाचे पूजन झाले.

शुक्रवारपासून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्यात आली आहेत. चित्रपटगृह, नाट्यगृहांत ५० टक्के प्रेक्षकांची मर्यादा असणार आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन सक्तीचे करण्यात आले आहेत. प्रेक्षकांना तसेच कलाकारांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे, तर दुसरीकडे आजपासून जलतरण तलावही खुले होणार आहेत.
बालगंधर्वमध्ये शुक्रवारी नटराजाचे तसेच रंगमंचाचे पूजन झाले. याप्रसंगी कलाकारांनी पारंपरिक गण तसेच गणेशाची प्रार्थना सादर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या रांगेत बसून त्याचा आस्वाद घेतला. यावेळी अजित पवार म्हणाले, परिस्थिती अशीच सुधारत राहिली तर दिवाळीनंतर नाट्यगृहामध्ये १०० टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात येईल.

मुंबईची चित्रपटसृष्टी बाहेर जाऊ देणार नाही. चित्रपटसृष्टीला सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले. दरम्यान, पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासबाबत दोन मतप्रवाह आहेत. पुनर्विकास करत असताना कलाकारांची अडचण व्हायला नको. यासंदर्भात महापौर आणि आयुक्तांशी बोलणार आहोत, असे ते म्हणाले.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *