दिवाळीत पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद

पुणे – दिवाळीनिमित्त पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी लसीकरण होणार नाही. शुक्रवारी केवळ सकाळच्या सत्रात लसीकरण करण्यात येणार आहे. दिवाळीमध्ये लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. लसीचा पहिला डोस १८ वर्षांवरील १०० टक्के पुणेकरांनी घेतला आहे. आता नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

पुणेकर लसीकरणाला उत्तम प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील लसीकरण वेगाने सुरू आहे. अशातच पुण्यात १८ वर्षांवरील १०० टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, आता सणासुदीच्या दिवसांत लोक कामांमध्ये गुंतलेली असतात. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे, तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी लसीकरण केंद्राचे कामकाज अर्धा दिवस सुरू राहील, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना लसीकरणाचा वेग वाढला आहे; पण दिवाळीमुळे केंद्रावर येऊन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आज गुरुवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्याने लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही. शुक्रवारी सकाळच्या सत्रात हे लसीकरण होईल. दुपारनंतर केंद्र बंद राहणार असल्यामुळे त्यानंतर येत्या शनिवारी आणि रविवारीसुद्धा लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …