साताऱ्यातील घटना
सातारा – दिवाळीनिमित्त घराला विद्युत रोषणाई करताना विजेचा धक्का लागून एका व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना येथे उघडकीस आली आहे. पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या पत्नीसह दोन मुलांनाही विजेचा धक्का लागला. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शहरातील मोरे कॉलनी भागात ही दुर्दैवी घटना घडली. सुनील तुकाराम पवार असे या दुर्घटनेत जीव गमवावा लागलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिवाळी सुरूहोत आहे. त्यामुळे पवार कुटुंबातही उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. सुनील पवार यांनी त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांसाठी घराच्या दारातच सुंदर किल्ला उभारला होता. वडिलांनी बनवलेल्या या किल्यामुळे मुले आनंदाने भारावली होती. कपड्यांची खरेदीही झाली होती. घरात फराळाची तयारी सुरू होती, मात्र त्याच वेळी घात झाला. दिवाळीच्या निमित्ताने शनिवारी सायंकाळी सुनील पवार हे घराला विद्युत रोषणाई करीत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी (मंजुषा) आणि दोन मुले (ओम आणि श्रवण) ही धावत गेली, मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला. ते तिघेही गंभीररित्या भाजले आहेत. या तिघांनाही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल क रण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …